महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली। महाराष्ट्र परिचय केंद्रात आज मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी  जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या महत कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी रोजी राज्यात मराठी पत्रकारदिन साजरा केला जातो.

Back to top button
Don`t copy text!