सोनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रम राबवित साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । फलटण । तालुक्यातील सोनगाव येथील हनुमान मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती सर्व तरुण मंडळ सोनगाव व ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहात एकत्रितपणे साजरी करण्यात आली.

या वेळेस मोठ्या प्रमाणात सोनगाव ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते मूर्ती पूजन व श्रीफळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

देशाच्या सीमेवर राहून देशासेवेसाठी स्वतःला झोकुन दिलेले आजी माजी सैनिक सुजित शेलार, संदीप ढवळे, अनिल जगताप, विपुल जगताप, सरपंच. सौ ज्योत्स्नाताई रमेश जगताप यांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले.

याप्रसंगी पोपटराव बुरुंगले, प्रा. राजेश निकाळजे, हनुमंत थोरात, कु. अलका मोहन सत्रे, रमेश जगताप यांनी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून सर्व तरुण मंडळ सोनगाव शाळा व्यवस्थापन समिती सोनगाव बंगला व जिल्हा परिषद शाळा राजाळे सर्कल यांच्या विद्यमाने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. एक आदर्श पिढी निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेऊन ही स्पर्धा राबविण्यात आली.

यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण या सारख्या महापुरुषांवर आधारित विषय देण्यात आले होते.

एकूण ३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. श्रेया महेश निकाळजे, द्वितीय क्रमांक कु. समीरा मनोज बल्लाळ, तिसरा क्रमांक कु. समृद्धी बाबासो लवटे, उत्तेजनार्थ क्रमांक कु. साक्षी किसन धुर्पती ह्यांनी पटकावले.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन हे शाळेचे मुख्याध्यापक धनाजी मोरे व आभार राजेश निकाळजे यांनी केले.

शालेय व्यवस्थापन समिती व तरुण मंडळ यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ज्ञानामृत बाल वाचनालयास सामाजिक कार्याची आवड असणारे शिवाजी ढवळे यांनी एकूण २० पुस्तके शाळेस भेट म्हणून दिली.

अशा विविध उपक्रमाने शिवजयंती आंनद आणि उत्साहात पार पडली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती सौ. ज्योत्स्ना जगताप, भगवान जगदाळे, जगन्नाथ जगदाळे, डॉ. योगेश बुरुंगले, दत्तात्रय ननावरे, हनुमंत ननावरे, संदीप पिंगळे, सौ. राणी संतोष गोरवे, सौ. वर्षा लेंबे, कोंडीबा लांडगे, चंद्रकांत शेंडे, बाळासो माने, दिलीप गायकवाड, नारायण तुपे, बाळासो यादव, हनुमंत ननावरे, बाबासो लवटे, सुभाष कांबळे, सुनील रिटे, रमेश वाघ, सचिन वाघ, संजय वाघमोडे, राजेंद्र लोंढे, शिवाजी गायकवाड, राजेंद्र टेंबरे, किसन सत्रे, हनुमंत निकाळजे, आंनदा चव्हाण, साहेबराव टेंबरे, बबन निकाळजे, महादेव चव्हाण, शशिकांत मोरे, उत्तम शेंडे सर्व शिक्षक वृंद व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन हे पोपटराव बुरुंगले, लखन पिंगळे, सुरेश पवार, राजेंद्र आडके, महादेव कांबळे, दिलीप भंडारे, संतोष गोरवे, राजेश निकाळजे, राहुल गायकवाड, रमेश मदने, संतोष आडके, गणेश कांबळे, अमोल सस्ते, सुधीर ओव्हाळ , धर्मराज लांडगे, राजू पाटोळे, गणेश यादव , निखिल कांबळे, अक्षय जगताप, सोमनाथ गायकवाड, शिवाजी ढवळे, विशाल निकाळजे, सचिन शेंडे, रोहन शेंडे, पप्पू पाटोळे, संजय वाघ, अभिषेक भोसले, अतुल लोंढे, संदीप नाळे, मयुर गोरे, अमर टेंबरे, सचिन शेवते, महेश जगताप, दादा पवार यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!