‘जय मल्हार सेंद्रीय गुळाचा चहा शॉप’ चा वर्धापन दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण दि.26 : येथील गजानन चौकानजिक नारळीबाग परिसरात अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पै.बजरंग गावडे कुटूंबियांच्या ‘जय मल्हार सेंद्रीय गुळाचा चहा शॉप’चा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला.

वर्धापनदिनानिमित्त गावडे कुटूंबियांना शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, धैर्यशील देशमुख, सुभाषराव घुले, डॉ.शिवाजीराव धावडे, पै.बापूराव लोखंडे, प्रियदर्शनी कोकरे, बजरंग खटके, प्रा.रमेश आढाव, जयकुमार शिंदे, विजयकुमा सोरटे, अरुण खरात, खंडेराव सरक, राजेंद्र भागवत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेंद्रीय खपली, गव्हाची लापशी, हुलग्याचे माडगे, आयुर्वेदिक काढा, सेंद्रीय गुळाचा चहा, साईचा गुळ, गुळाची जिलेबी, चुलीवरील वडा पाव, सामोसा, कचोरी आदी पदार्थांचे कौतुक केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार राहुल गावडे, चेतन गावडे, रोहन गावडे यांनी मानले.

गावडे कुटूंबियांना शुभेच्छा देताना अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर. समवेत पै.बजरंग गावडे व मान्यवर.

Back to top button
Don`t copy text!