खासदार रणजितसिंह यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करा : जयकुमार शिंदे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२३ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या वाढदिवशी केंद्रीय गृह मंत्री ना. अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये ना. शाह यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे थांबता येणार नाही. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा दिन साजरा करावा, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

प्रतिवर्षी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस हा फलटण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक हे येत असतात. परंतु या वर्षी केंद्रीय गृह मंत्री ना. अमित शाह हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या दौऱ्यामध्ये असणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये सेवा दिन साजरा करावा; यामध्ये फळ वाटप, रक्तदान शिबीर, गाव व मंदिर स्वच्छता असे उपक्रम राबवावेत, असे हि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!