स्थैर्य,दि २१: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी CBI अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी CBI चे पथक रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींच्या घरी दाखल झाली. या पथकाने अभिषेक यांच्या पत्नी रुजीरा बॅनर्जींना तपासात सहकार्य करण्यासाठी समन जारी केला आहे. CBI ने यापूर्वीही रुजीरा यांना नोटीस जारी केली आङे.
शुक्रवारी 13 ठिकाणांवर छापेमारी
या कोळसा घोटाळा प्रकरणी CBI ने शुक्रवारी राज्यातील पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकातामध्ये 13 ठिकाणांवर छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा, व्यापारी अमित सिंह आणि नीरज सिंह यांच्या ठिकाणांवर करण्यात आली. छापेमारीदरम्यान कुणीट घरी नव्हते. यापूर्वी 11 जानेवारीला अंमलबजावनी संचालनालया(ED) ने हुगली, कोलकाता, उत्तर 24 परगना, आसनसोल, दुर्गापूर, बर्धमानमध्ये छापेमारी केली होती.
तृणमूल नेत्यांवर आरोप
कोळसा घोटाळा प्रकरणात TMC नेत्यांवर आरोप आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जी यांचेही नाव आहे. आरोप आहे की, बंगालमध्ये अवैधरित्या हजारो कोटी रुपयांच्या कोळशाचा उपसा झाला आणि एका रॅकेटमधून याला ब्लॅक मार्केटमध्ये विकण्यात आले. याप्रकरणी डिसेंबर 2020 मध्ये CBI ने कोलकातातील CA गणेश बगारियाच्या ऑफीसवर छापेमारी केली होती.
सप्टेंबरमध्ये तपास सुरू झाला; कोर्टाने CBI ला मंजुरी दिली
मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोळसा घोटाळ्याचा तपास सुरू झाला होता. तेव्हापासून BJP याप्रकरणी TMC वर आरोप लावत आहे. BJP नेत्यांचे म्हणणे आहे की, कोळसा घोटाळ्यातून मिळालेल्या काळ्या पैशांना TMC नेत्यांनी शेल कंपन्यांद्वारे व्हाइट मनी करुन घेतले. यात सर्वाधिक फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींना झाला. अभिषेक बॅनर्जी TMC च्या युवा विंगचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पक्षात विनय मिश्रासह 15 जणांना महासचिव बनवले होते. विनय मिश्रा आधीपासूनच कोळसा घोटाळ्यातील आरोपी आहे.