दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
हनुमंतवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत दि. ४ एप्रिल २०२३ रोजी साबळे यांच्या हनुमंतवाडीच्या ढाब्यावर फिर्यादी हे लालासो मच्छिंद्र साबळे याच्याकडे (रा. हनुमंतवाडी, ता. फलटण) ‘तू माझ्या बायकोकडे का बघत असतोस’, असे विचारण्यासाठी गेले असता लालासोा साबळे याने ‘ए पारध्या, काय करायचे ते कर’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून काठीने व हाताने मारहाण केली, अशी तक्रार फिर्यादी किरण परमेश्वर पवार (वय ३३, रा. पवारवाडी, ता. फलटण) यांनी दि. ५ एप्रिल २०२४ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी लालासो मच्छिंद्र साबळे (रा. हनुमंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस करीत आहेत.