सोयाबीन विकलेले पैसे शेतकर्‍यांना दिले नाहीत; तासवडे एमआयडीसीतील कंपनीवर गुन्हा

दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२६ | कराड |
सोयाबीन विक्रीचे पैसे शेतकर्‍यांना न दिल्याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात घाडगे-पाटील (निलेश सदाशिव घाडगे) अ‍ॅग्रो फूड्स अँड श्रीशा मसाले (प्लॉट क्र. डी-२४, एमआयडीसी तासवडे, ता. कराड, जि. सातारा) या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच इतर परिसरातील ज्या शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीला सोयाबीन विक्री केली असून अद्याप पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचीही फसवणूक झाली असेल, अशा सर्व शेतकर्‍यांनी तातडीने पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीची बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह तळबीड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!