
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । खटाव, ता. खटाव येथे एकाला दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ रोजी खटाव येथे पारायण मंडपाजवळील रस्त्यावर इन्फ्रा सर्विसेस प्रा. लि. या कंपनीचे खटाव विभागाचे सुपरवायझर सागर सुरेश कुंभार रा. रहिमतपुर, ता. कोरेगाव यांनी फोन करून संदीप अशोक काटकर रा. खटाव यांना भेटायला बोलावले. ते कंपनीचे टेक्निशियन सोमनाथ भरत भोसले यांच्याजवळ आले असता तुझी मस्ती जिरली का, आता तुला कंपनीने कामावरून कमी केले असे म्हणून दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
