
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2011 पासून ते 8 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रीती वीरेंद्र गाडे वय 33 रा. न्यू विकास नगर, सातारा या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती वीरेंद्र बाजीराव गाडे वय 39 याने तिला मारहाण केली. तसेच नणंद शितल हर्षल पन्हाळे वय 36, हर्षल चंद्रकांत पन्हाळे वय 38, चुलत दीर महेंद्र परमेश्वर गाडे वय 50, सुशीला महेंद्र गाडे वय ४६ यांनी चारित्र्यावर आरोप करून तिची बदनामी केली. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत.
