मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बकासुर गँगवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । येथील प्रतापगंज पेठेत कौंतेय कॉम्प्लेक्स समोर रस्त्यावर एका मुलाचा खुनाचा प्रयत्न करून गर्दी व मारामारी केल्याप्रकरणी बकासुर गँगच्या आठ ते दहा जणांच्या टोळीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ नोव्हेंबर रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास प्रतापगंज पेठेत शाहिद युसुफ इनामदार, वय १७, सैदापुर, ता. सातारा याचा मित्र आयर्न विशाल कडाळे, रा. बुधवार पेठ परिसर, सातारा याला बकासुर गॅंगला हप्ता न देता त्यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याचा राग व हफ्ता डबल करण्याबाबत मेसेज करूनही हप्ता न दिल्याच्या रागातून यश जांभळे, अण्णा माने, राहुल बर्गे, शुभम साठे, जेल्या उर्फ जालिंदर, टेट्या उर्फ गौरव भिसे, धनराज घोडके अशा बकासुर गँगच्या आठ जणांनी आयर्न कडाळे याच्यावर चाकुने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शाहिद इनामदार याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!