‘कार स्पा’ अल्पावधीतच बारामतीकरांच्या पसंतीस उतरेल: सौ.पौर्णिमाताई तावरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

‘कार स्पा’ या अत्याधुनिक कार वॉशिंग सेंटरचे उद्घाटन करताना सौ.पौर्णिमाताई तावरे. समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, किरणदादा गुजर, शिरीष बानसरे, बाळासाहेब जाधव, राहुल वाघोलीकर, जितेश निगडे – देशमुख.

स्थैर्य, बारामती, दि.३० : ‘कार स्पा’ हे अत्याधुनिक कार वॉशिंग सेंटर बारामतीकरांसाठी अभिमानास्पद असून ते निश्‍चितच अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्‍वास बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई तावरे यांनी व्यक्त केला.

फलटण (जि.सातारा) येथील निगडे कुटूंबियांच्यावतीने बारामती शहरातील ‘मोतीबाग’ (इंदापूर रोड) येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘कार स्पा’ या अत्याधुनिक कार वॉशिंग सेंटरचे उद्घाटन नुकतेच सौ.पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, नगरसेवक शिरीष बानसरे, नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक राहुल वाघोलीकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बारामतीकरांच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या या व्यवसायात ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देवून निगडे कुटूंबियांनी प्रगती साधावी. अत्याधुनिक व आकर्षक पद्धतीने वाहनांची स्वच्छता या ठिकाणी होणार असल्याने बारामतीकर याला उत्तम प्रतिसाद देतील असा विश्‍वास वाटतो.

किरणदादा गुजर म्हणाले, बारामतीमध्ये अशा अत्याधुनिक कार वॉशिंग सेंटरची कमतरता होती, ती फलटणकरांनी आज पूर्ण केली आहे. कोणताही व्यवसाय सचोटीने आणि प्रामाणिकपणे केला तर त्याला भरभराट निश्‍चित असते. ग्राहक देवता मानून केलेले उद्योग बारामती शहरात यशस्वी झालेले आहेत. त्याचपद्धतीने निगडे परिवाराने सुरु केलेला हा व्यवसायही निश्‍चित यशस्वी होईल.

प्रारंभी व्यवसायाबद्दल प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देताना जितेश निगडे – देशमुख यांनी सांगितले की, अत्याधुनिक पद्धतीने कारच्या बाह्य भागावर उत्तम संरक्षण देणे, कारच्या बाह्य भागाला मूळ चमकदार बाह्य आवरण देणे, सूर्याच्या अति तीव्र अशा युवी किरणांपासून संरक्षण देणे, कारच्या रंगावर थर तयार करुन संरक्षण देणष, बारीक ओरखडे व ऑक्सिेडेशन थर काढणे, बाह्य भागावरील गंज चढण्यासाठी संरक्षण देणे, कारच्या आतील भागांना स्वच्छ आणि सुरक्षित करणे, सिट्स, डॅशबोर्ड, सर्व दरवाजे, डिक्की, सीटबेल्ट, रुफ इत्यादी साफ करणे, फायबर घटकांना चमकप्रदान करणे, आतील भागांना नवीन लुक देवून मूळ रंग प्रदान करणष, अन्न आणि इतर घटकांमुळे तयार झालेला दुर्गंध घालवणे, कारमध्ये तयार झालेले विषाणू घालवणे व याद्वारे कारमधील प्रवाशांसाठी उत्तम आरोग्य निर्माण करणे आदी सेवा ‘कार स्पा’ च्या माध्यमातून ग्राहकांना या ठिकाणी मिळणार आहेत. 

सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजेंद्र निगडे – देशमुख व डॉ.योगेश थोरात यांनी केले. कार्यक्रमास बारामती परिसरातील मान्यवरांसह, नागरिक, निगडे – देशमुख कुटूंबिय उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!