अग्नीपथ योजना रद्द करा आटपाडीत राष्ट्रवादीचे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । पुणे । शिक्षणाच्या वयात नोकरी आणि चार वर्षातच बेरोजगारी असे स्वरूप असलेल्या केंद्र सरकारच्या तिन्ही सैन्य दलातील चार वर्षासाठी भरती निघालेल्या अग्नीपथ योजना रद्द करा म्हणून आज आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले .

आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस, अन्य सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते . यावेळी केंद्र सरकार च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या .

प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात आले .त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांच्या नेतृत्वा खाली आणणाभाऊ साठे चौक आटपाडी येथे हे आंदोलन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष रणजित पाटील ,युवा नेते सौरभ भैय्या पाटील, युवक नेता अतुल पाटील, युवा जिल्हा कार्यकारणी सदस्य परशुराम सरक, सोशल मिडिया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, वक्ता सेलचे तालुका अध्यक्ष प्रा संताजी देशमुख, सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अक्षय मोरे, नितीन डांगे, अक्षय जाधव, संभाजी जाधव, धनाजी ठेंगले शरद सोन्नुर, बीरा सोन्नुर संकेत गायकवाड, विशाल जाधव, दीपक पाटील, सोन्या पाटील इत्यादी अनेक जण उपस्थित होते .


Back to top button
Don`t copy text!