दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे लाभार्थीस गुणत्तापूर्ण लॅमिनेटेड एचडीपीई रिइन्फोर्स्ड / वोव्हन जिओमेम्ब्रेन (500 मायक्रॉन) फिल्म-टाईप II या पुरवठा आणि उभारणीकरिता उत्पादकांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी दि. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज मागवित आहे. दिलेल्या तारखेनंतर रु. एक हजार दंडासह अर्ज दि. 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करता येतील.
उत्पादक ( ज्याला अर्जदार म्हणूनही संबोधले जाते) उत्पादनाच्या हमी, वॉरंटी आणि देखभालासह पुरवठ्याकरिता उत्पादक नोंदणीसाठी वैयक्तिक अर्जदार म्हणून किंवा योग्य भागीदारांसह अर्ज करु शकतो. अर्जदार यांना रिइन्फोर्स्ड/वोव्हन एचडीपीई जिबोमेम्ब्रेन फिल्म, 500 मायक्रॉन, BIS (IS 15351:2015) च्या उत्पादन, पुरवठा आणि उभारणीचा व्यापक अनुभव असावा.
इच्छुक उत्पादकांनी संचालक, महाराष्ट्र राज्य फोलोत्पादन व औषणी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे- 411005 या कार्यालयात विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी www.mahanhm.in आणि www.krishimaharashtra.gov.in वर भेट द्यावी.