तांब्याची तार चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । सातारा । नेले, ता. सातारा गावच्या हद्दीत ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ ते दि. २५ सप्टेंबर दरम्यान नेले गावच्या हद्दीत बिबवीचा माळ शिवारात अज्ञात चोरट्याने ट्रांसफार्मरमधील ऑइल खाली सांडून ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार सचिन सर्जेराव चौरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!