सांगवी येथे रक्तदान शिबिरामध्ये कृषीकन्यांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत सांगवी तालुका फलटण येथे अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन करून व खाऊ वाटप करत या कार्यक्रमास हातभार लावला.

या कार्यक्रमामध्ये सांगवी गावचे सरपंच संतोष मोरे सर व कार्यक्रम व्यवस्थापक हेगडकर सर यांनी व इतर ग्रामस्थांनी उपस्थित दाखवली.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी स्वप्निल लाळगे सर, प्रा. नीतिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अनुजा भिसे, तनुजा शिंगाडे, अंकिता कुंभारकर, प्रणिता आगवणे, ऋतुजा भामे, पूजा चौधर यांनी रक्तदानाचे आवाहन करणारे तक्ते बनवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


Back to top button
Don`t copy text!