
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यावाचा आहे त्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वाई येथे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत.
या प्रशिक्षणामध्ये फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, फळबाग व्यवस्थापन, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषि पर्यटन बाबत अहमदनगर, पुणे, नाशिक विभागातील कृषि संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठे, प्रगतशिल शेतकरी यांचे प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजन आहे. अधिक माहितीसाठी गावाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी तथा तालुका कृषि अधिकारी वाई कार्यालयाशी संपर्क साधावा.
