धनवडेवाडी येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । सातारा । धनवडेवाडी येथे अज्ञात चोरट्याने सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ते 20 जानेवारी दरम्यान धनवडेवाडी, तालुका सातारा येथे राहणाऱ्या निवास चंद्रकांत पवार वय 47 यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे एक लाख 74 हजार 679 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांनी भेट दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलतुंबडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!