
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील सदरबझार परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7 लाख 54 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ऑगस्ट रोजी 6.30 ते दि. 24 ऑगस्ट रोजी 8.45 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणार्या गुलमोहर कॉलनीतील मयुरेश्वर प्लॉट नंबर 1 येथील राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरामध्ये असणारे 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 4 हजार 700 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार सुरेखा गुरुनाथ महाडिक यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
