
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । सालपे तालुका फलटण येथे एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सात जुलै रोजी च्या संध्याकाळी साडेसात ते दिनांक आठ रोजी च्या सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान रमेश भिकाजी शिंदे वय 53 राहणार सालपे, तालुका फलटण यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.
