
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२४ | फलटण |
फलटण शहरातील लक्ष्मीनगरमधील जलमंदिराशेजारी असणार्या स्वाती अशिष अहिवळे यांच्या बंद घराचे टेरीसचे खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून सुमारे २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीची अधिक माहिती अशी, दि. ९ ते १२ जून २०२४ दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी स्वाती अहिवळे यांच्या बंद घरात टेरिसच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. यावेळी चोरट्याने घरातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३ हजार रुपये रोख रक्कम व १० हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या निरंजन व एक चांदीची समई, असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
या चोरीचा अधिक तपास म.पो.हवा. पूनम वाघ करीत आहेत.
