दर्जाई येथे घरफोडी ४ लाख ८१ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । दर्जाई तालुका खटाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने चार लाख 81 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे हा प्रकार दिनांक 27 सप्टेंबर सायंकाळी सहा ते दिनांक 28 सप्टेंबर सकाळी सात या दरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले यासंदर्भात भीमराव राजाराम यादव वय 67 यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे प्राप्त माहितीनुसार यादव काही कामासाठी घर बंद करून बाहेर गावी गेले होते अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या कंपाउंड गेटचे तसेच घरातील दरवाजांचे कुलूप तोडून आठ प्रवेश केला आणि बेडरूम मधील लोखंडी व लाकडी कपाटातील कुलूप तोडून 11 तोळे 95 मिली वजनाची सोन्याचे दागिने किंमत चार लाख 78 हजार रुपये तसेच चांदीचे तीन हजार तीनशे रुपये किमतीचे दागिने असा चार लाख 81 हजार रुपयांचा ऐवज हा तो हात लांबवला सकाळी फिर्यादी यादव घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले पोलीस उपनिरीक्षक लोंढे अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!