‘बुलडाणा अर्बन’ची शेतक-यांना तब्बल एक कोटी 13 लाखांची मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, भुईंज, दि.२१: शेतकऱ्यांच्या काळजीतून नुकसान भरपाई म्हणून विम्याच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनने एक कोटी 13 लाखांची केलेली मदत शेतकरी हिताची आहे, असे मत किसन वीर साखर सातारा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले. 

बुलडाणा अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने ही मदत देण्यात आली. किसन वीर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊसतोडणी यंत्राचे मालक जितेंद्र घाटे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना बॅंकेच्या वाई शाखेकडून कर्जपुरवठा करण्यात आला होता. त्यांच्या वारसांना 25 लाखांचा धनादेश, तर खंडाळा येथील अजित भोसले यांच्या संपूर्ण नुकसान झालेल्या ऊसतोडणी यंत्राच्या नुकसान भरपाईपोटी 88 लाख रुपयांच्या विमा धनादेशाचे वितरण भोसले यांच्या हस्ते झाले.

यावेळी बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पुणे कमर्शिअल बॅंकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, कारखान्याचे संचालक विजय चव्हाण, मालोजीराजे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लड्डा, पुणे कमर्शिअलचे संचालक अनिल शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील उपस्थित होते. भोसले म्हणाले, “”गेल्या तीन- चार वर्षांपासून सहकारी साखर कारखान्यापुढे ऊसतोड मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत यांत्रिकीकरणाने ऊसतोड करणे हा उपक्रम “किसन वीर’ने राबवला. त्याला बुलडाणा अर्बनने मशिन मालकांना अर्थसाहाय्य करून खऱ्या अर्थाने प्रोत्साहित केले.”

देशपांडे म्हणाले, “”बुलडाणा सोसायटीने किसन वीरच्या विद्यमाने शेतकरी हा शेतकरी न राहता तोही एक उद्योजक, व्यावसायिक व्हावा या हेतूने शेतकऱ्यांच्या मालकीचे हार्वेस्टर मशिन खरेदी करून कारखाना व्यवस्थापनाने यांत्रिकीकरणाने ऊसतोडणीस बळ दिले. त्याचा फायदा अनेक मशिन मालकांना झाला आहे. सोसायटीने खातेदार, ठेवीदार व कर्जदारांना विनामोबदला विम्याचे कवच दिले आहे.” बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापक मनोहर देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर विजय चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी चंद्रकांत इंगवले, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, प्रभारी कार्यकारी अशोकराव शिंदे, विठ्ठल कदम, मृत वारसांचे कुटुंबीय उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!