
स्थैर्य, मुंबई, दि.२१: इंग्लंडमध्ये आढळलेला करोनाचा नवा स्ट्रेन, यामुळे
जगभरातील विविध देशांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर घातलेले
निर्बंध, व करोना लसीबाबतची अनिश्चितता या सगळ्यांचे प्रतिकूल परिणाम आज
(सोमवारी) शेअरबाजारात उमटले. ( stock market news today )
मागील
काही दिवसांपासून सातत्याने उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा
सेन्सेक्समध्ये आज (सोमवारी) १८०० अंकांची जोरदार घसरण झाली तर राष्ट्रीय
शेअर बाजाराचा निफ्टी १३,३०० अंकांपर्यंत खाली आला आहे.
मागच्या
आठवडयाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक
प्रथमच ४७ हजारावर पोहोचला होता. पण करोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्याने
जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले आहेत.
तर ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा नव्याने कडक लोकडाऊन लागू
करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) मुंबई शेअर बाजाराच्या
सेन्सेक्सवर प्रतिकुल परिणाम होऊन तो गडगडला.