
स्थैर्य, फलटण, दि.१३: सिमेंट उत्पादक कंपन्यांच्या मनमानीमुळे सिमेंटच्या किंमतीत अनैसर्गिक दरवाढ झाली आहे. सिमेंट व स्टील च्या अवास्तव दरवाढीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असुन, या विरोधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे फलटण येथे धरणे आंदोलन करुन सिमेंट दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने सिमेंट नियंत्रण प्राधिकरण निर्माण करुन साठेबाजी व कृत्रीम भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
सिमेंट व स्टीलच्या दरवाढीविरोधात बिल्डर्स असोसिएशनने संपूर्ण देशभर आज धरणे आंदोलन पुकारले होते. त्याचाच भाग म्हणून फलटण येथील बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने अधिकारगृहाबाहेर धरणे आंदोलन केले. यामध्ये बिल्डर्स असोसिएशन बरोबर कंत्राटदार महासंघ, क्रेडाई, मजुर फेडरेशन याही संघटना सहभागी झाल्या होत्या.
चेअरमन विक्रम झांजुर्णे, महासंघ अध्यक्ष सिकंदर डांगे, प्रमोद निंबाळकर, रणधीर भोईटे, भोजराज नाईक निंबाळकर, जावीद तांबोळी यांचे हस्ते प्रांताधीकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, मनुभाई पटेल, क्रेडाई अध्यक्ष विजय जाधव, प्रमोद जगताप, दिलीप शिंदे, केदार करवा, सचिन निंबाळकर, राजीव नाईक निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, संदिप जाधव, सुनील जंगम, विकास म्हेत्रे, संजय डोईफोडे, राजकुमार दोशी, किरण दंडिले, राजेंद्र कापसे, शफिक मोदी, महेश गरवालीया, विकास शिंदे, अंशुमन नाईक निंबाळकर, सुनील सस्ते, रवी करचे, अमोल शिंदे, युवराज निकम, नितीन बोबडे, चंदन साळुंखे, सुरेश पखाले, बापु गावडे, विनोद धायगुडे, ललित करचे, महेश साळुंखे, सतीश रणवरे, आदींसह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.