खुनाचा प्रयत्न करणार्‍या पानटपरीचालकाला अटक


स्थैर्य, सातारा, दि.१३: तालुक्यातील कारंडवाडी येथील पानटपरीसमोर एकाच्या पोटात चाकून भोसकून त्याला जखमी करत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारंडवाडी येथील एका पानटपरी चालकावर गुन्हा दाखल झाला. त्याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंडवाडी येथील नवनाथ कॉलनी परिसरात लक्ष्मण धनंजय पाटील याची पानटपरी आहे. गुरुवार, दि. 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजय भोसले आणि लक्ष्मण धनंजय पाटीलया दोघांच्यात वादावादी झाली. याचे पर्यवसान भांडणात झाले. यावेळी लक्ष्मण पाटील याने पानटपरीतील चाकू हातात घेतला आणि आता तुला सोडत नाही. तुला ठारच करुन टाकतो, असे म्हणत चाकू त्यांच्या पोटात डाव्या बाजूत घुसवला. यात विजय भोसले जखमी झाले. याप्रकरणी विजय भोसले यांची पत्नी स्वाती भोसले (वय 25, रा. गौरीशंकर कॉलेजवळ, देगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर लक्ष्मण धनंजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला तत्काळ अटकही करण्यात आली. या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!