दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२४ | फलटण |
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे बौध्द समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव असून बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असताना या प्रवर्गाला राजकीय संधी मिळणे अनिवार्य होती, मात्र गेली १५ वर्षे विधानसभेची संधी मिळाली नाही. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता संविधान समर्थन समितीच्या वतीने राजकीय व सामाजिक विचार विनिमय करण्यासाठी मतदारसंघातील बौद्ध समाजाचा हा महामेळावा आयोजित केला आहे. शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीमगीतांचा कार्यक्रमही या मेळाव्यात होणार आहे.
मेळाव्याला येणार्या वाहनांची पार्किंग व्यवस्था अशी – सातारा रोड, गिरवी, विंचुर्णी मार्गे येणारी वाहने डेक्कन चौक येथे पार्क होतील. यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे पंढरपूर रोड मार्गे येणारी वाहने पार्किंग होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ, फलटण (बारामती व पुणे मार्गे येणारी वाहने), रामराजे शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर शिंगणापूर रोड (दहिवडी व शिंगणापूर मार्गे येणारी वाहने) येथे पार्क होतील.