बुद्ध पौर्णिमेनिमित्त नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्याकडून भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्थैर्य, फलटण, दि. 1 मे : शांती, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (बुद्ध पौर्णिमा) फलटण शहरात विविध उपक्रम आणि अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच औचित्यावर फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन प्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल निंबाळकर, सुदाम (अप्पा) मांढरे, नगरसेविका सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मीना काकडे, सौ. रुपाली सस्ते, सौ. अस्मिता लोंढे, युवा नेते रणजितसिंह भोसले आणि नगरपरिषदेचे नगरअभियंता रत्नरंजन गायकवाड आदी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी भगवान गौतम बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांचे स्मरण करत एकमेकांना व फलटणकरांना बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!