फलटणच्या आकाश डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश; सात विद्यार्थ्यांची थायलंड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


दैनिक स्थैर्य | दि. 16 जुन 2025 | फलटण | येथील आकाश डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आयोजित राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवले आहे. या यशामुळे क्लासच्या 7 विद्यार्थ्यांची थायलंड येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याबाबत माहिती देताना आकाश डान्स स्टुडिओचे प्रमुख हर्षद कदम यांनी सांगितले की, पुणे येथील स्पर्धेत कु. अद्विका गाढवे (मायनर गट, द्वितीय क्रमांक), कु. पलक मेहता (ज्युनिअर गट, द्वितीय क्रमांक), कु. प्रणाली भोसले (द्वितीय क्रमांक), कु. कादंबरी जाधव (सिनीयर गट, द्वितीय क्रमांक), कु. विराज शिंदे (ज्युनियर गट, तृतीय क्रमांक), कु. काव्या रणवरे (तृतीय क्रमांक), कु. अनुश्री जगदाळे (चतुर्थ क्रमांक) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचा स्पर्धा संयोजकांकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना राजेंद्र संकपाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, आकाश डान्स स्टुडिओच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करुन विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!