दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । सातारा । चंद्रपूर येथे झालेल्या 20 व्या वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत सातारा बॉक्सिंग अकॅडमीची खेळाडू
यशश्री धनावडे हिने ४५ ते ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. २१ ते २७ ऑक्टोबर रोजी हरियाणा येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली.
दरम्यान, अकॅडमीची दुसरी खेळाडू ऋतुजा खताळ हिने ५० ते ५२ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले तसेच मधुर दौलतराव भोसले याने भारतीय खेळ प्राधिकरण, पटियाला पंजाब यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ६ विक NIS सर्टिफिकेट बॉक्सिंग प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याबद्दल या तिघांचाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व मान्यवरांनी सत्कार केला. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप व विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरव केला. यावेळी सातारा बॉक्सिंग ॲकॅडमी चे अध्यक्ष हरीश शेट्टी, रवींद्र होले, अमर मोकाशी, संजय पवार, विजय मोहिते , तेजस यादव, अंकुश माने, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर, शैलेंद्र भोईटे, ओमकार गाढवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.