अजिंक्यतारा’ चा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । सातारा । शाहूनगर- शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा ३८ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. या समारंभास सर्व संचालक, सभासद, बिगर सभासद, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर आदी उपस्थित राहणार असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थितांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे आणि कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!