वाई एमआयडीसीत दोघांना मारहाण करत वार करून गंभीर जखमीं

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, वाई, दि. १७ : किरकोळ कारणावरून व पूर्ववैमनस्यातून रविवार पेठ येथील एकावर औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात रात्री साडेनऊच्या दरम्यान तिघांनी दोघांना मारहाण करत एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यात अक्षय नंदकुमार निकम (वय 25) हा युवक गंभीर जखमी झाला.

अक्षय निकम व धीरज दगडे हे दोन मित्र औद्योगिक वसाहत येथील चांदणी चौकात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. अमन शेख, संग्राम शिर्के, ऋतिक गाढवे सर्व रा. बोपर्डी यांनी तेथे येत अक्षय निकम याला ‘तू मोठा भाई झाला आहेस, तुला खूप मस्ती आली, आता याची मस्तीत पुरेपूर जिरवू या’ असे म्हणत अक्षय नंदकुमार निकम (वय 25 सर्वानंद नगर, रविवार पेठ वाई) याला व धीरज दगडे याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. तर बोपर्डी येथील अमन शेख, संग्राम शिर्के, ऋतिक गाढवे या तिघांनी अक्षय वर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणात अक्षय निकम याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करत आहेत.

अक्षय निकम हा मागील काही महिन्यांपूर्वी रविवार पेठ येथे झालेल्या टोळीयुद्धात सहभागी झाला होता. त्यातून पुढे बोपर्डी येथील युवकांशी वाद झाला होता. या वादातून सोमवारी रात्री अक्षय निकम याच्यावर हल्ला करून मारहाण करून धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले आहे. यामुळे वाई येथे पुन्हा टोळीयुद्ध डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!