
दैनिक स्थैर्य । 24 जून 2025 । फलटण । येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेमध्ये बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. २६ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, फलटण शाखेचे मुख्य प्रबंधक चंद्रकांत जगताप यांनी दिली.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच करण्यात येते. यंदाच्या वर्षी फलटण शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन फलटण शाखेत करण्यात आले आहे.
“राष्ट्रहित सर्वोपरी” हा ध्येय मंत्र घेऊन भारतीय स्टेट बँक गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत आहे. आताच्या बदलत्या काळानुसार बँकेच्या सर्वच ग्राहकांनी सुद्धा बँकेच्या मुख्य प्रवाहात अर्थात “राष्ट्रहित सर्वोपरी” ह्या ध्येयमंत्राशी सामावले पाहिजे, असे सुद्धा जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्व ग्राहक, हितचिंतक व देशाभिमानी नागरिक यांना याप्रसंगी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व रक्तदात्यांना आकर्षक स्मरण भेट देण्याचे व न्याहारीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

