फलटण तालुक्यातील गोखळीच्या ६ वर्षाच्या कु. स्वराने सायकलिंगने पार केले १४३ किलोमीटरचे अंतर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि. ७ : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील सहा वर्षाच्या कु. स्वरा भागवतने 12 तासांत सायकलींग करत १४३ किमी अंतर सर करून नवा विक्रम रचला आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते कु.स्वरा भागवतचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, उपसरपंच योगेश गावडे पाटील, नवनाथ गावडे, छावा ग्रुपचे योगेश जाधव, राजेन्द्र भागवत, योगेश भागवत उपस्थित होते. 

कु.स्वरा गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत यांची कन्या असुन वयाच्या तिसरे वर्षी पोहायला शिकली आहे. सायकलींग बरोबर धावणे, दोरीवरील एका दमात 100 उड्या चे 10 सेट, ट्रेकिंग,

स्किटींग छंद जोपासले आहेत. 

बुधवार दि.4 नोव्हेंबर रोजी गोखळी -बारामती -मोरगांव-जेजुरी -नीरा -लोणंद-फलटण -राजाळे -गोखळी असा 143 कि.मी.अंतराचा सायकल प्रवास 12 तासात पूर्ण करून विक्रम केला.पहाटे 3:45 वाजता प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी चार वाजता गोखळी येथे संपला. 

कु.स्वरा हिस तिचे वडील योगेश भागवत यांनी सर्व पोहोणे,धावणे, दोरी उड्या आणि सायकलींचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण देतात वडील फलटण एस.टी.आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. तिचे काका पोलीस उपनिरक्षक श्री रूपेश भागवत आणि पोलीस काॅस्टेबल निलेश भागवत,आजोबा राजेन्द्र भागवत यांना सर्वांना व्यायामाची आवड असल्यामुळे स्वराने यांच्याकडून प्रेरणा घेतली. व लॉक डाऊन मध्ये आपल्या व्यायामाला सुरुवात केली.

स्वराच्या व्यायामाच्या व्हिडिओ सोशल मीडिया वरती खूप पसंती मिळत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!