एसटी कर्मचा-यांच्या थकीत वेतनासाठी इंटक आक्रमक


स्थैर्य,मुंबई, दि ७ : कोरोनाच्या संकट काळातसुध्दा एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर आहे. मात्र, एस. टी. कर्मचा-यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. वेतन प्रदान अधिनियम, १९३६ या कायदयाने फौजदारी गुन्हा आहे, त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचा-यांना तीन महिन्याचे वेतन देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अन्यथा महामंडळावर फौजदारीची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने केली आहे. 

इंटकने कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य सोशल मिडिया प्रमुख सहदेव डोळस, ज्ञानोबा नागरगोजे, नरसिंग सोनटक्के, डी. बी. कुंभार, ज्ञानेश्वर वेतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सह कामगार आयुक्त अ.द. काकतकर, सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे यांनाही निवेदन देऊन चर्चा केली. 

आज महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यांना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने निवेदने देण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!