फलटण तालुका महिला आघाडी नूतन पदाधिकारी निवडी जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२४ : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघांतर्गत फलटण तालुका महिला आघाडी नूतन पदाधिकारी निवडीसाठी फलटण येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांनी महिला आघाडी प्रमुखपदी (नेते) दिपाली महामुलकर यांची तर फलटण तालुका महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सीमा मदने, सरचिटणीसपदी प्रतिभा फडतरे, कार्याध्यक्षपदी शर्मिला फरांदे, कोषाध्यक्षपदी शुभांगी बोबडे यांच्या निवडीची घोषणा केली.

अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार रा.बा.लावंड (बापू), सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मच्छीद्र मुळीक, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते सुरेशराव गायकवाड, प्राथमिक शिक्षक बॅकेचे गटनेते मोहन निकम, सातारा जिल्हा परिषद शिक्षण कमिटीचे तज्ञ सदस्य रुपेश जाधव, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रविण घाडगे, प्राथमिक शिक्षक बॅकेचे विद्यमान संचालक अनिल शिंदे, भगवान धायगुडे उपस्थित होते.

सातारच्या जान्हवी चा जगात डंका सिद्धासन आसनमध्ये 5 तासाचा केला नवा विश्वविक्रम

नवनिर्वाचित फलटण तालुका महिला प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – 

महिला आघाडी प्रमुख (नेते ) दिपाली महामुलकर, तालुकाध्यक्ष सीमा मदने, सरचिटणीस प्रतिभा फडतरे, कार्याध्यक्ष शर्मिला फरांदे, कोषाध्यक्ष शुभांगी बोबडे. 

नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा प्राथमिक संघाचे सरचिटणीस राजेंद्र बोराटे, शिक्षक बॅकेचे विद्यमान संचालक अनिल शिंदे, मावळते तालुकाध्यक्ष लालासाहेब भंडलकर, कोषाध्यक्ष सतिश जाधव, माजी संचालक सिकंदर शेख, विक्रम दिवटे, जिल्हा नेते शशिकांत सोनवलकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, गंगाराम काटकर, बाळकृष्ण मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 हॉटेल चालकांनी नियमांचे काटकोरपणे पालन करा : तानाजी बरडे

माजी अध्यक्ष लालासाहेब भंडलकर यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे व जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज तांबोळी यांनी सुत्रसंचालन केले.शेवटी संचालक अनिल शिंदे यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!