गोडोलीत साडेदहा लाखांची घरफोडी


 

स्थैर्य, सातारा, दि.२०: येथील गोडोलीतील मंगलमूर्ती कॉलनीतील सुरज भीमराव गायकवाड यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडेदहा लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

सुरज गायकवाड हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत. दिनांक १५ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र, चेन, सोन्याच्या बांगड्या असा सुमारे १० लाख ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!