पंढरपूरची एसटी सेवा बंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि १: राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी एक लाख
भाविकांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोर्चा काढण्याच्या वंचित बहुजन
आघाडीने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे येणारी एसटी सेवा
बंद करण्यात आली आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश
आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेशाचे
आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नावाखाली सरकारने विनाकारण
धार्मिकस्थळे बंद ठेवल्याचा दावा करत वंचितने हे आंदोलन पुकारले आहे.
त्यामुळे सोमवारी पंढरपुरात वारक-यांनी गर्दी करू नये आणि त्यामुळे कोरोना
संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
जिल्हाधिका-यांनी पंढरपूरमध्ये येणा-या सर्व एसटी सेवा बंद करण्याचे आदेश
दिले आहेत. तसेच विठ्ठल मंदिर परिसरात दहा फूट उंचीचे लोखंडी बॅरेकेटिंग
लावण्यात आले आहेत. कुणीही मंदिरात प्रवेश करू नये म्हणून हे बॅरिकेटिंग
लावण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपुरात पोलिसांचा
प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.

पंढरपुरात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तावर वंचित बहुजन आघाडीने
सडकून टीका केली आहे. कितीही रेलिंग किंवा बॅरिकेटिंग करा आम्ही विठ्ठल
मंदिरात प्रवेश करणारच असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद
चंदनशिवे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे यांनी दिला आहे. आम्ही रेलिंग
तोडून मंदिरात प्रवेश करू. विठ्ठलाचा दरबार उघडला तर राज्यातील कोरोना पळून
जाईल. त्यामुळे सरकारने मंदिरं खुले करावीत, अशी मागणीही चंदनशिवे यांनी
केली आहे. सरकारने वंचितच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. हे आंदोलन
दडपण्याचा प्रकार सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!