फलटण बिल्डर्स असोसिएशनचे तरुणांना रोजगाराची संधी साधण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.18 : कोरोना आपत्तीमुळे शासकीय नोकरींसह सर्वच रोजगारांवर गदा आली आहे. अशा परिस्थितीत फलटण तालुक्यातील व परिसरातील सुशिक्षित,अर्धशिक्षित तरुणांसाठी बिल्डर्स असोसिएशन सरसावली असून याबाबत मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे बिल्डर असोसिएशनचे चेअरमन विक्रम झांजुर्णे व सचिव केदार करवा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. यानुसार शेतीनंतर सर्वाधिक रोजगाराचे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्रात संधी आहेत. येथे कुशल अकुशल कामगरांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. केवळ रोजीरोटीच पुरविणारा हा व्यवसाय नसून आपल्यातील कल्पकतेनुसार कामगार ते बिल्डर असा प्रवास केलेल्यांचाही इतिहास आहे. यापुर्वी परराज्यातून अनेकजण कामगार म्हणून येथे  येवून कष्ट करत हालाखीत रहात आपली व कुटुंबाची सुधारणा करतो बंगले बांधून राहतो मग स्थानिक तरुणांनी रोजगाराविषयी ओरड न करता व कष्टाची लाज न बाळगता मागे राहू नये उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. येथे गवंडीकाम, सेंट्रींग, प्लंबिंग, वायरिंग, फरशीकाम, दरवाजे खिडकीकाम, रंगकाम, वॉटरप्रुफींग, फर्निचर, पेस्टकंट्रोल, इलेक्ट्रिक, वेल्डींग अशा नानाविध संधी आहेत. कोरोनामुळे परराज्यातील या क्षेत्रात कार्यरत असलेला बहुतांश कामगारवर्ग हा आपल्या गावी निघून गेला आहे. यामुळे आता स्थानिक तरुणांनीच याचा फायदा घेतला पाहिजे. तसेच सरकारने बांधकाम क्षेत्र हे संघटीत क्षेत्र जाहीर करुन कामगारांची नोंदणी केलेली आहे. त्यांना स्वत:च्या घरासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदाराकडे विश्‍वासू कामगार म्हणून लवकरात लवकर संपर्क साधावा. आणि कुशल कामगार म्हणून स्थिर व्हावे व आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुधारावे. दर आठवड्याला नियमित पगार मिळणारा रोजच्या रोज घरचे जेवण मिळू शकणारा तसेच घरी जोडधंदा आणि महत्वाचे म्हणजे बिगारी ते बिल्डर असा प्रवास साध्य करु शकणारी ही संधी आहे. आपल्याच प्रगतीच्या वाटा खुल्या आहेत यात उतरुन आपण या संधीचा लाभ घ्यावा त्यासाठी बिल्डर असोसिएशन कटिबध्द असून सर्वप्रकारचे मार्गदर्शन मेळावे, तांत्रीक ज्ञान रोजगार पुरवठा करण्यास अग्रेसर असून याचा फायदा सर्व तरुणांनी घ्यावा व आपली प्रगती साध्य करावी असे आवाहन केलेे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!