फलटणमध्ये प्रभाग क्रं.10 मध्ये धान्य, भाजीपाला वाटप व औषध फवारणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि.18 : प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउन नंतर अनेक कुटुंबावर संकट कोसळले. अशा संकटसमयी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप 4500 किलो, कोबी 1000 किलो, टोमॅटो 1000 किलो, सोडीयम हायड्रो क्लोराइडची ३ वेळा प्रभागात फवारणी, फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. तसेच रामराज्यात म्हणजेच फलटण नगरीत कोणीही उपाशी राहणार नसल्याची ग्वाही देत सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळत आपल्या घरीच सुरक्षित राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर यांनी केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!