विलगीकरण कक्षात असणाऱ्या 232 जणांचे घशातील स्त्राव पाठविले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

काल बनपुरी येथे अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचाही घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवला

स्थैर्य, सातारा दि. 18 : आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांचे आणि   बनपुरी येथे क्वारंटाईन कक्षामध्ये असलेल्या मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 43 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने तीचाही  कोविड संशयित म्हणून नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.         

आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 105, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 67, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 11, ग्रामीण रुणालय कोरेगांव येथे 17 व ग्रामीण रुणालय वाई येथे 12 असे एकूण 232 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!