आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळे सातारा, कास- बामणोली एस.टी. बस सुरु;३८ गावांचे दळणवळण पुर्ववत; ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान


 

स्थैर्य,सातारा, दि ७: कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बससेवा बंद आहे. कास, बामणोली या मार्गावरील बससेवा बंद असल्याने ३८ गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. लॉकडाऊन उठवण्यात आला असून सातारा, कास ते बामणोली. तेटली बससेवा सुरु करावी अशी मागणी बामणोली परिसरातील स्थांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ विभाग नियंत्रकांना सुचना केल्याने सातारा, कास ते बामणोली बससेवा पुन्हा सुरु झाली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभुमीवर प्रशासनाने बससेवा पुर्णपणे बंद ठेवली होती. सातारा, कास, बामणोली ते तेटली या मार्गावर ३८ गावे असून या गावातील लोक प्रवासासाठी एस.टी. बसवर अवलंबून असतात. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून बससेवा बंद होती. लॉकडाऊन उठवण्यात आला तरीही बससेवा सुरु न झाल्याने ३८ गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी संपर्क साधून बस पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ सातारा डेपोच्या विभाग नियंत्रकांना दूरध्वनी करुन सातार, कास, बामणोली बससेवा त्वरीत सुरु करण्याच्या सुचना केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार सातारा, कास, बामणोली, तेटली या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली असून ३८ गावांचे दळणवळण पुर्ववत सुरु झाले. 

बससेवा पुर्ववत सुरु झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा बामणोली भागाच्यवातीने राम पवार, काशिनाथ जाधव, संजय जाधव, रामचंद्र कोकरे, प्रविण जाधव आदी ग्रामस्थांनी सत्कार करुन आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!