“दार उघड उद्धवा, दार उघड!” मंदिराची दारे उघडण्यासाठी फलटणमध्ये घंटानाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूपबंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक फलटण येथे देण्यात येत आहे. त्यानुसार काल (ता.२९) राज्यभर घंटानाद करण्यात आले. 

१८ मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत. श्रावणही विनापूजा, दर्शनाचा गेला. आता पितरांच्या आठवणींचा भाद्रपदाचा पितृपक्ष २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. एकीकडे कोरोना महामारीचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे लोकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने उपासमारीने लोक मरण्याची वेळ आली आहे. त्याबाबत राज्य सरकार संभ्रमित असून, कुठलाही ठोस निर्णय‌ घेत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी कोळकी येथील मारुती मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन छेडण्यात आले.

कोरोनामुळे पाच महिन्यांपासून भाविकांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत घंटा नाद आंदोलनाचा इशारा दिला होता. 

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने फलटण शहरामध्ये श्रीराम मंदिर, जैन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, चांदतारा मशिद येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या चिटणीस सौ. मुक्ती शहा, फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते,  नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, अमरसिंह नाईक निंबाळकर, पै. बजरंग गावडे, ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक शहा, संजय चिटणीस यांच्यासह बहुसंख्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोळकी येथील मारुती मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या घंटा नाद आंदोलनात ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश घाडगे, संदीप नेवसे, रामभाऊ शेंडे, बाळासाहेब काशीद, प्रदीप भरते, राजाभाऊ जगदाळे, अरविंद शिंदे, रणजित जाधव, अभिजित शिंदे सहभागी झालेले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!