अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा


 

स्थैर्य,मुंबई, दि ६: शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

ही भेट घेतल्यानंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले आहे की, ‘शेतकरी आंदोलनातील सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असणार आहे. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीमध्येही ते हजेरी लावतील. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे’

रानडुकरांकडून स्ट्रॉबेरीचे अतोनात नुकसान

काही दिवसांपूर्वीच शेतकरी विधेयक पारीत झाल्याच्या विरोधात शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले होते. तर शिवसेना एक वर्षापूर्वीच एनडीएमधून बाहेर पडली आहे. शिवसेने पाठोपाठ अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपला धक्का बसला होता. यानंतर आता भाजपविरोधात व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दल शिवसेनेची मदत घेत आहे. यासाठीच अकाली दलाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!