बनावट नंबर प्लेट तयार करून मोटरसायकल वापरले प्रकरणी गुंड अनिल कस्तुरे यास अटक व पोलिस कस्टडी


 


स्थैर्य, सातारा, दि.११: सातारा शहरातील रेकॉर्डवरील गुंड अनिल महालिंग कस्तुरे रा करंजे सातारा याने त्याचे नातेवाईकाचे नावे असलेली ॲक्सिस मोटरसायकल ही आरटीओ पासिंग न करता एखादा दखलपात्र गुन्हा, अपघात, देशविघातक कृत्यात सदर वाहनाचा झालेला सहभाग यापासून बचाव व्हावा या हेतूने तसेच वाहनाचा रोड टॅक्स विमा रक्कम भरणा करावयास लागू नये व पोलिस यंत्रणा, आरटीओ, फायनान्स कंपनी कडून होणाऱ्या कारवाईपासून चालकाचे व मालकाचे रक्षण व्हावे या गैरहेतूने सदर मोटारसायकलला एम एच 11 सी सी 8887 अशा बनावट क्रमांकाची नंबर प्लेट लावून ती सातारा शहरात व इतरत्व तिचा वापर केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वाहतूक विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर आरोपी विरुद्ध शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे फसवणूक व बनावटी करणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये स्प्लेंडर मोटर सायकल एम एच 11 सी सी 8887 या बनावट नंबर प्लेट चा वापर केला असल्याने नमूद क्रमांकाचे वाहनावर ऑनलाइन फाईन जात होता त्याबाबत स्प्लेंडर मोटर सायकलचे मूळ मालकास सहा वेळा दंड झालेला आहे. त्याबाबत मोटरसायकलचे मूळ मालकास संशय आल्याने सदरचा बनावट नंबर प्लेट चा प्रकार उघडकीस आलेला आहे. सदर प्रकरणातील आरोपी गुंड अनिल महालिंग कस्तुरे यास शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हेड.काॕ. हसन तडवी, अमित माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहीते यांचे पथकाने शोध घेऊन सापळा लावुन अटक केलेली आहे. सदर आरोपीस सन्माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीची उद्यापर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी हे करीत आहेत. सातारा शहरात अशा प्रकारे बनावट नंबरप्लेटचा वापर करणारी टोळी (रॕकेट) आहे काय याबाबत तपास करणेत येत आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!