
स्थैर्य, कोल्हापूर, दि. 19 : संपूर्ण देशात छोटया छोटया राज्यानी करोना संसर्गावर क्रेन्द्र सरकारच्या मदतीने मात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले असताना केवळ अकार्यक्षमता, भष्ट्र कार्यपद्धती व निर्णय क्षमतेच्या अभावामूळे या आणीबाणीच्या काळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पुर्णतः असर्मथ ठरले असून त्यामूळे महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार, नोकरदार, व सर्वसामान्य नागरीक मुत्युच्या खाईत लोटले जात असल्यामूळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलनच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अश्या आशियाचे निवेदन हातकणंगले तालुका भाजपाच्या वतीने तहसिलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, तालूका अध्यक्ष राजेश पाटील, बाळासाहेब गारे, आण्णासो चौगुले, सतिश पाटील, पी.डी पाटील, राजेद्र सुर्यवंशी, रमजान मुजावर आदि सह कार्यकते उपस्थित होते.