
दैनिक स्थैर्य । 9 मे 2025। सातारा । भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीने भारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करत सातारा शहरातून दुचाकीवरून तिरंगा रॅली काढली. या रॅलीमध्ये द्वाकीवरून शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी मारत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा करत सारे वातावरण देशभक्तीमय करून टाकले.
या तिरंगा रॅलीला सकाळी दहा वाजता राजवाडा येथून सुरुवात झाली. ही रॅली मोती चौकामार्गे पंचमुखी गणपती मंदिर, पोलीस मुख्यालय तेथून शिवतीर्थावर पोहोचली. येथे यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.
या रॅलीला सातारकरांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. ही रॅली पुन्हा नगरपालिका, शाहू चौक, कमानी हौद, देवी चौक, पुन्हा राजवाडा अशी येऊन तेथे रॅलीची सांगता झाली. सातारकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी ’भारत माता की जय वंदे मातरम’ च्या घोषणा दिल्या.
या रॅलीमध्ये शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, माजी शहरप्रमुख विकास गोसावी, चिन्मय कुलकर्णी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, वैशाली टंगसाळे रीना भणगे, ऋषिकेश पाटील, अश्विनी हुबळीकर, रोहिणी क्षीरसागर, विश्वजित यादव, आदित्य गोवेकर, विराज गायकवाड, रुद्रा जाधव, धीरज फडतरे, प्रणव शिंदे, संगमेश्वर पाटील, बंटी खरे, रोहन शिंदे, किशोर पवार इत्यादी उपस्थित होते.