
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | कोळकी | तालुक्यातील विडणी गावामधील भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विडणी गावामध्ये भारतीय जनता पार्टीला व सरपंच गटाला मोठा धक्का लागल्याने मानले जात आहे.
श्रीमंत रघुनाथराजे यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठलराव नाळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शरद नाळे, अंकुश नाळे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन सतीश घाडगे, सामाजिक कार्यकर्ते पंकज नाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये अर्थात राजे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
