भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशला रवाना

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । मुंबई । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तुकडी बुधवारी उत्तर प्रदेशला रवाना झाली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला. आ. राहुल नार्वेकर, आ. राजाभाऊ राऊत, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय पाण्डेय आदी या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, वेगवेगळया राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते पाठविण्याची अनेक वर्षांपासूनची पद्धत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठीही अन्य राज्यांतून कार्यकर्ते येत असतात. उत्तर प्रदेशला जाणारे कार्यकर्ते आपल्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे हे कार्यकर्ते ५४ विधानसभा मतदारसंघातील प्रचारात सहभागी होतील. मोर्चाचे ५०० अनिवासी भारतीय कार्यकर्तेही प्रचारात सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ . संजय पाण्डेय यांनी दिली. उत्तर भारतीय मोर्चाचे संतोष सिंग, प्रद्युम्न शुक्ल, अनिल राय आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!