भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्याकडून पक्ष कार्यकर्त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन


स्थैर्य, मुंबई, दि.०८:  भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मा. सी. टी. रवी यांनी मंगळवारी मुंबईत कोरोना काळात सेवाकार्य करताना निधन पावलेले भाजपा कार्यकर्ते रमेश भंडारी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि पक्ष भंडारी कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे गोरेगावचे कार्यकर्ते रमेश भंडारी यांनी कोरोनाच्या साथीत सेवाकार्यात भाग घेतला होता. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षातर्फे अडीच लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेण्यासाठी मा. सी. टी. रवी आले होते. त्यांनी रमेश भंडारी यांच्या पत्नी अपर्णा व मुलगा सिद्धार्थ यांच्याशी बातचित केली व पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, पक्षाचे उत्तर- पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, नगरसेवक दीपक ठाकूर, संदीप पटेल आणि गोरेगाव भाजपचे अध्यक्ष विजय गायकवाड उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!