दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली लागू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अर्चना वाघमळे यांनी दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेसमोरील थांबवावे, असे आवाहन वाघमळे यांनी पत्रान्वये युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष यांना केले आहे. युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली लागू करावी यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले होते, त्यास यश आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना अर्चना वाघमळे यांनी म्हटले आहे की, ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली लागू करणेबाबत व ई ग्रामस्वराज अॅपवर दर महिना संपल्यानंतर ग्रामपंचायतीची आर्थिक माहिती भरणेबाबत नमूद केले आहे.
ग्रामसेवकांना बोयोमॅट्रिक प्रणाली लागू करणेबाबत शासन स्तरावरून कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करणेत येत आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बोयोमॅट्रिक प्रणाली अॅप कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू असून ही कार्यवाही ३ महिने कालावधीपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेतली जात आहे.
ई-ग्रामस्वराज प्रणालीवर शासनाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार मासिक लेखे यांची माहिती भरण्यात येते, असे वाघमळे यांनी सांगितले आहे.